संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचा 100 टक्के निकाल

0
कोपरगाव (प्रतिनिधी) – मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्वच्या सर्व 45 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.  पुष्कराज विश्‍वास गोर्डे हा विद्यार्थी 92.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात सर्वप्रथम आला आहे. कुमारी प्रीती जावळे (88) ही दुस-या क्रमांकाने सुषमा राजेंद्र देवकर (85) सागर अनिल आभाळे (85) टक्के गुण मिळवून अनुक्रमे तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना प्राचार्य बाळासाहेब जाधव व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माजीमंत्री शंकरराव कोल्हे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आमदार स्नेहलता कोल्हे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीपतराव गवळी वाल्मीकराव भिंगारे कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे सचिव तुळशीराम कानवडे व्यवस्थापकीय सरव्यवस्थापक एस के सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*