प्रीतिसुधाजी स्कूलचा 100 टक्के निकाल

0
अस्तगाव (वार्ताहर)- प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचा एसएससी बोर्डाचा निकाल सलग 31 व्या वर्षी 100 टक्के लागला आहे. या स्कूल मध्ये प्रज्ज्वल नालकर हा विद्यार्थी 89.40 टक्के मिळवून प्रथम आला आहे. विजय  घोडे हा 88.20 टक्के मिळवून दुसरा आला. हरीश चोरडिया हा 86.60 टक्के गुण मिळवून तृतीय आला. निशांत कदम याला 83.80 टक्के, शिवराज खुडे यास 83.20, असे प्रथम पाच विद्यार्थी स्कूल मध्ये आले. या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे  डांगेज पॅटर्नचे जनक संस्थापक प्राचार्य इंद्रभानजी डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका सौ. पूनम डांगे, उपाध्यक्षा सौ. स्नेहलता डांगे, कार्याध्यक्ष भगवानराव डांगे, कार्यालयीन अधिक्षक शिवाजी देवढे, डॉ. मधुकर देशमुख, डॉ. पी. जी. गुंजाळ, डी. यु. जोशी, यांनी कौतुक केले आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डांगे, अशोक गाढवे, सचिन गिते, बसवराज पाटील, विष्णुवर्धन, अदिनाथ मुजमुले, मोहित साळुंके, स्वाती देवढे, भारती गुजर, अरविंद पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*