शेवगाव तालुक्यातील नऊ शाळांचा निकाल 100 टक्के

0

तालुक्याचा सरासरी निकाल 93 टक्के; तीन हजार 760 विद्यार्थी उत्तीर्ण

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – दहावीच्या ऑनलाईन निकालात शेवगाव तालुक्यातील नऊ माध्यमिक विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेस 46 विद्यालयांतून बसलेल्या चार हजार 43 विद्यार्थ्यांपैकी तीन हजार 760 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा सरासरी निकाल 93 टक्के लागला आहे.
तालुक्यात 100 टक्के निकाल लागलेल्या विद्यालयात शहरातील विखे पाटील माध्यमिक विद्यालय, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, तर ग्रामीण भागातील रामेश्वरदास माध्यमिक विद्यालय हातगाव, निर्मलाताई काकडे माध्यमिक आश्रमशाळा मंगरूळ, न्यू इंग्लिश स्कूल गदेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल आखेगाव, बापूजी बुधवंत विद्यालय निंबेनांदूर, सहकार महर्षी मारुतराव घुले पाटील विद्यालयाचा समावेश आहे.
या परीक्षेत यश मिळवलेल्या 3 हजार 760 विद्यार्थ्यापैंकी विशेष प्राविण्य 1 हजार 209, प्रथम श्रेणी 1 हजार 711, द्वितीय श्रेणी 789 तर 51 विद्यार्थी पास श्रेणीत आहेत. तालुक्यातील नवजीवन विद्यालय दहिगाव ने 85.25, श्री शिवाजी विद्यालय बोधेगाव 97.42, श्रीराम विद्यालय ढोरजळगाव 96.89, चापडगाव हायस्कूल 98.08, अमरापूर हायस्कूल 96.72, उर्दू हायस्कूल शेवगाव 98.21, शहरटाकळी विद्यालय 87.71,आदर्श कन्या विद्या मंदीर शेवगाव 90.32 असे लागलेले आहेत.

आबासाहेब काकडे विद्यालयाचा निकाल 98.28 टक्के असून विद्यालयात अभिषेक किसन जाधव 98.60 टक्के प्रथम, दिग्विजय गणेश शिनगारे व गीतांजली अप्पासाहेब मडके गीता 98.20 टक्के द्वितीय तर सारिका अप्पासाहेब मुरदारे 96.60 टक्के तृतीय असे गुणानुक्रम मिळवले आहेत. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. विद्याधर काकडे, जि. प. सदस्या हर्षदा काकडे, मध्यवर्ती समितीचे प्रा. शिवनाथ देवढे, प्राचार्य भानुदास भिसे, उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे, पर्यवेक्षक रावसाहेब नन्नवरे, चंद्रकांत आहेर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
रेसिडेन्शिअल हायस्कूलचा निकाल 92.67 टक्के लागला आहे. येथे आदित्य दीपक झाडे 99.20 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला असून त्याने गणित विषयात 100 गुण प्राप्त केले आहेत. संपदा कंठाळी 98.20 टक्के द्वितीय तर उद्धव बडे 96.80 टक्के गुण मिळवत तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंतांचे प्राचार्य लक्ष्मण कासार उपप्राचार्य दिलीप फलके यांनी अभिनंदन केले आहे.
पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलचा निकाल 91.47 टक्के असून कु. सिया जाजू 98.60 टक्के प्रथम, विजेता लोढा 96.60 टक्के द्वितीय, गार्गी चांदगावकर 94.60 टक्के गुण असा गुणानुक्रम आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे रमेश भारदे, हरीश भारदे व प्राचार्य गोरक्ष बडे यांनी अभिनंदन केले.
प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे.

या विद्यालयात कु. वाखुरे ऋतुजा शंकर हिने 97.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक राठी प्रथमेश हरिप्रसाद याने 97.00 टक्के, तृतीय क्रमांक मरकड ऋषिकेश कारभारी 96.00 टक्के, चतुर्थ क्रमांक जाजू श्रुतिका प्रेमसुख 95.20 टक्के तर रुईकर प्रणव कल्याणराव 94.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात पाचवा आला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त व सचिव डॉ. राजेंद्र विखे पाटील, शैक्षणिक समूहाचे कार्यकारी संचालक युवराज नरवडे यांनी अभिनंदन केले आहे.
आदर्श विद्या मंदिरचा निकाल 90.32 टक्के असून कौस्तुभ मुकुंद अंचवले 94.20 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला आहे.

एकनाथ माध्यमिक विद्यालय एरंडगाव शाळेचा निकाल 94.91 टक्के असून मुस्कान पठाण 85.8 टक्के गुण मिळवून प्रथम, ज्ञानेश्वरी भागवत 85 टक्के गुण मिळवून दुसरी तर संकेत भागवत 84.8 टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

  या परीक्षेत शेवगाव येथील रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या आदित्य दीपक झाडे याने 99.20 गुणांसह तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. त्याला गणितात 100 गुण प्राप्त झाले आहेत. बाळासाहेब भारदे हायस्कूलची कु. सिया जाजू 98.60 गुणासह तालुक्यात मुलींमध्ये पहिली आली आहे. तिने गणित व संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. तर आबासाहेब काकडे विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.

LEAVE A REPLY

*