बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदींच्या बहिणीच्या घरावर आयकर विभागाचा छापा

0

पटना : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या बहिणीच्या घरावर आयकर विभागाच्या पथकाने गुरूवारी पाटणा येथे सृजन घोटाळ्याप्रकरणी छापा टाकला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी याचवर्षी सुशीलकुमार मोदी यांची बहीण आणि भाचीवर या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. दरम्यान मोदी यांच्या बहिणीच्या घरातून काय जप्त करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची बहीण रेखा मोदी आणि त्यांची भाची उर्वशी मोदी यांनी सृजनमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप २८ जून २०१८ ला आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करत केला होता. यासाठी पुरावा म्हणून त्यांनी बँकेचे स्टेटमेंटही जोडले होते. सुशीलकुमार मोदी आणि नितीशकुमार २५०० कोटींच्या घोटाळ्यासाठी थेट जबाबदार आहेत. पण सीबीआय याप्रकरणी त्यांचे नावही घेत नाही आणि त्यांची चौकशीही करत नाही, असा सवाल यादव यांनी उपस्थित केला होता.

सृजन घोटाळा बाबत..

मनोरमा देवी यांनी सृजन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आणि त्याची पत्नी ती संस्था चालवत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या बँक खात्यात ठेवण्यात आलेला सरकारी पैसा सृजन संस्था आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला होता. अनेक सरकारी विभागातील रक्कम थेट विभागीय खात्यात न जाता ती थेट सृजन महिला विकास सहयोग समितीच्या सहा खात्यात हस्तांतरित होत. १३ ऑगस्ट २०१७ मध्ये नितीशकुमार यांनी सृजन घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.

LEAVE A REPLY

*