श्रीदेवीला पडली होती नाशिकची भुरळ; व्हायचे होते नाशिककर, पण…!

0

देशदूत डिजिटल विशेष 

नाशिक | बॉलिवूडची चुलबुली गर्ल सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी बोनी कपूर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी बॉलीवूडच्या सितारयांनी आपली घरे घेतलेली आहेत. पण मुंबईच्या अगदी जवळ असणाऱ्या नाशिकमध्येही आता अनेक कलाकार भविष्यातील वास्तव्यासाठी घरे थाटत  असून अनेक कलाकारांचे घरं आता नाशिकमध्येही झाले आहेत.

श्रीदेवीदेखील लवकरच नाशिककर होणार होत्या पण अचानक त्यांच्या जाण्याने त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले आहे. दिनांक २७ मे २०१३ रोजी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी नाशिकमधील एका नामांकित कंपनीच्या हाउसिंग प्रकल्पाला भेट दिली होती.

श्रीदेवी समवेत पती बोनी कपूर, अभिनेता मिलिंद गुणाजी हेदेखील होते. पर्यावरणपूरक असणारे हे घर श्रीदेवी यांना खूप भावले होते.

या घराच्या बुकिंगसाठी आठ लाखांचा चेकदेखील त्यांनी कंपनीच्या संचालक आणि पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द दिला होता. त्यामुळे श्रीदेवी लवकरच नाशिककर होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते.  श्रीदेवी नाशिककर होणार या वृत्तामुळे नाशिककरांनादेखील अभिमान वाटत होता.

 

मात्र, आज दुबईत एका कौटुंबिक सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी गेलेल्या श्रीदेवी यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे श्रीदेवी यांचे नाशिकमधील घराचे स्वप्न अधुरेच राहिले असल्याने नाशिककरांना प्रचंड दु:ख झाले आहे.

नाशिकने धार्मिक पर्यटनाबरोबरच आता शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातही प्रगती केली आहे. त्या

मुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळाली आहे. इगतपुरीतील नैसर्गिक सौदर्यामुळे याठिकाणीही चित्रपटसृष्टी उदयास येणार आहे.  अनेक बॉलीवूड चित्रपटांचे शुटींग नाशिक आणि परि

 

सरात झाले आहे. त्यामुळे लवकरच नाशिकला नवी ओळख मिळणार आहे. त्यामुळे नाशिकला अनेक कलाकार पसंती देत असून  भविष्यातील वास्तव्याचे ठिकाणी म्हणून नाशिककडे बघत आहेत.

आजही अनेक कालाकरांचे नाशिकमध्ये घरेदेखील आहेत.  श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने नाशिककर चाहत्यांनी शोक व्यक्त करत सोशल मीडियातून दु:ख व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*