श्री श्री रविशंकर यांच्या सत्संगाचे जानेवारीत शिर्डी येथे आयोजन

0
शिर्डी (प्रतिनिधी)- साई समाधी शताब्दीनिमित्त साईभक्तांसाठी योगगुरू श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत जानेवारीत सत्संगाचे आयोजन करण्यात आले असल्याचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी सांगितले.
श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत शिर्डीत सत्संगाचा कार्यक्रम व्हावा अशी ईच्छा साईभक्तांकडून होती. साईसंस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी बंगलोर येथे जाऊन श्री श्री रविशंकर यांना साईसंस्थानच्या वतीने सत्संग कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते.
सोमवारी प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, राहाता तालुका वारकरी संप्रदायचे अध्यक्ष अरुण चौधरी, नीलेश संकलेचा, पंकज संकलेचा यांनी बंगलोर येथील आंतरराष्ट्रीय योगा केंद्रात श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षात शिर्डीत सत्संगाचे आयोजन करावे अशी साईभक्तांची व ग्रामस्थांची इच्छा पूर्ण करावी.
साईसंस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून शिर्डीत सत्संग कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी विनंती केली. श्री श्री रविशंकर यांनी कैलास कोते यांचे शिर्डी भेटीचे निमंत्रण स्वीकारले असून येत्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात येण्याचे मान्य केले.

LEAVE A REPLY

*