Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारेला कांस्य

Share

नवी दिल्ली- भारताचा युवा कुस्तीपटू राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात पाचवं पदक आलं आहे. राहुलने 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

कझाकिस्तानच्या नूर सुल्तान येथे ब्रॉन्ज मेडल सामन्यात राहुल आवारेने अमेरिकेचा कुस्तीपटू टायलर ली ग्राफ याला पराभूत केलं. दरम्यान, ऑलिम्पिकच्या न येणार्‍या गटात राहुलनं पदक पटकावलं आहे. त्यामुळे या पदकानंतरही तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणार नाही. या आधी दीपक पुनियाने 86 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली होती. नूर-सुलतान, कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या या जागतिक कुस्ती स्पर्धेतून विनेश फोगट, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी दाहिया यांनी 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे.

जामखेडच्या मूळगावी आनंद..
नगर जिल्ह्यातील जामखेडमधील माळेवाडी हे मराठमोळ्या राहुल आवारेंचे मूळ गाव आहे. राहुलने 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याचे कळताच गावात आनंद व्यक्त करण्यात आला. राहुलची वडिलोपार्जित शेती या गावात आहे. त्याचे नातेवाईक आज या गावात राहतात. त्याचे चौथीपर्यंतचे शिक्षण माळेवाडीतील झेडपीच्या प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर आवारे कुटुंब बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे स्थायिक झाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!