दुबई : ’द महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमी’ला 11/11 चा मुहूर्त

0

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दुबईमध्ये ’द महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमी’ या नावाने क्रिकेटच्या नव्या इंनिंगला सुरुवात करतोय.

शनिवारी (11/11/2017) या अॅकॅडमीचे धोनी स्वत: उद्घाटन करणार आहे. त्यानंतर रविवारी तो याच ठिकाणी नवोदीत क्रिकेटर्ससोबत एक विशेष चर्चा सत्रात सहभाग होणार आहे.

दुबईतील स्पिंगडेल्स स्कुल कॅम्पसच्या परिसरात क्रिकेट अकॅडमी सुरु करण्यासाठी धोनीच्या कंपनीने दुबईतील पॅसिफिक वेंचर्स या कंपनीसोबत करार केलाय.

पॅसिफिक वेंचर्स कंपनीचे संचालक परवेझ खानने धोनीच्या नावाने सुरु होणारी अकॅडमी अद्यावत असल्याचे स्टार स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले. ते म्हणाले की, धोनीसारख्या खेळाडूची दुबईमध्ये अॅकडमी असणे भाग्यशाली गोष्ट आहे. या अकॅडमीच्या विस्ताराबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशात अकॅडमी सुरु करण्याबाबत विचार करत असल्याचे परवेझ यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

*