उद्यापासून भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका

0
सिडनी | ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत धूळ चारल्यानंतर  टीम इंडिया आता एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व गाजविण्यासाठी सज्ज झाली आहे.

उद्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. शनिवारी बहुतांश ठिकाणी सुट्टी असते त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पहिला एकदिवसीय सामन्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. एकूणच उद्याचा शनिवार हा  ब्लॉकबस्टर  शनिवार  ठरणार आहे.

भारतीय  प्रमाणवेळेनुसार सकाळी  पावणेआठ वाजता हा सामना सुरु होईल. सामन्याचे  थेट  प्रक्षेपण  सोनी  सिक्स  वाहिनी  आणि  टेन थ्री  वर  करण्यात  येणार  आहे.  या  मैदानावर  जवळपास  ४८ हजार प्रेक्षक  बसू  शकतात.

त्यामुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. एकदिवसीय मालिकेत विजय मिळविण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

या  मैदानावर  पहिला  एकदिवसीय  सामना  ऑस्ट्रेलिया  आणि  इंग्लंड  या दोन  संघांमध्ये  १९७९ साली  खेळला  गेला  होता.  तर  अखेरचा  एकदिवसीय  सामना  ऑस्ट्रेलिया  आणि  इंग्लंड  या दोन  संघांमध्ये  जानेवारी  २०१८  मध्ये  खेळवण्यात  आला  होता.

या  मैदानावरील  सर्वाधिक  धावसंख्या  ४०८-५ दक्षिण  आफ्रिका  विरुद्ध  विंडीज  २०१५ साली झाली होती. या सामन्यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने १३० सामने  खेळले  असून  यात  ८५ लढतीत  विजय  मिळवला आहे.

तर  ३९ लढतींमध्ये  त्यांचा  पराभव  झाला  आहे. भारतीय  संघाने  १९ सामने  खेळले  असून  यात  भारताला  ५ लढती  जिंकता  आल्या  आहेत. तर  १३ लढतींमध्ये  भारताचा  पराभव  झाला  आहे.

दक्षिण  आफ्रिका  संघाने  विंडीज  संघाचा  २५७ धावांनी  २०१५ मध्ये  दणदणीत  पराभव  केला  होता. अॅलेन  बॉर्डर  याने  या मैदानावर  ६५ सामन्यात  १५६१ धावा  केल्या  आहेत.  ही  आतापर्यंतची  सर्वाधिक  कामगिरी  आहे.

असे असतील संभाव्य संघ

भारत : रोहीत  शर्मा , शिखर  धवन , विराट  कोहली  (कर्णधार), अंबाती  रायडू , केदार  जाधव , दिनेश  कार्तिक , एम  एस  धोनी (यष्टीरक्षक), हार्दीक  पंड्या  कुलदीप  यादव , लोकेश  राहुल , युझवेन्द्र  चहल , रविंद्र  जडेजा , भुवनेश्वर  कुमार , जसप्रीत  बुमरा , खलील  अहमद  आणि  मोहंमद  शमी

ऑस्ट्रेलिया : ऐरन  फिंच ( कर्णधार ), उस्मान  ख्वाजा , शॉन  मार्श , पीटर  हॅंड्सकॉब , ग्लेन  मॅक्सवेल , मार्कस  स्टोइनस , मिचेल  मार्श , अलेक्स  केरी ( यष्टीरक्षक ), झये  रिचडसन , बिली  स्टॅन्लेक , जेसन  बेरेंडॉफ , पीटर  सीडल , नेथन  लायन  आणि  ऍडम  झाम्पा

सलिल  परांजपे, नाशिक 

LEAVE A REPLY

*