भारत- न्यूझीलंड टी२० मालिका ६ फेब्रुवारीपासून

0

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड दोन संघांमधील पाच सामन्यांच्या मालिकेचा थरार आटोपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन टी २० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता खेळवला जाणार आहे. सामन्यांचे थेट प्रेक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.

भारतीय संघाची कामगिरी न्यूझीलंड विरुद्ध टी २० सामन्यांमध्ये कायमच निराशाजनक राहिलेली आहे. आजवर हे दोन्ही संघ ८ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात न्यूझीलंड संघाने ६ वेळा भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली आहे. भारतीय संघाला केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. भारतीय संघ टी २० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असून न्यूझीलंड संघ सहाव्या स्थानी आहे. हा सामना वेलिंग्टन या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

हे मैदान वेस्पार्क मैदान म्हणून ओळखले जाते. या मैदानावर एकूण ३७,००० प्रेक्षक बसू शकतात. या मैदानावर न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये २००६ साली झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने श्रीलंका संघांचा १८ धावांनी पराभव केला होता. भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये २००९ मध्ये झालेल्या लढतीत न्यूझीलंडने भारताचा ५ गडी राखुन पराभव केला होता. या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या २२१/३ आहे तर नीचांकी धावसंख्या ७२ आहे. मैदानावरील सर्वात मोठा विजय वेलिंग्टन ७ गडी राखुन विरुद्ध ओटॅगो डिसेंबर २०१७ हवामान :७५% उष्णता राहण्याची शक्यता तसेच ७०% पाऊस पडण्याचा अंदाज या खेळाडूंवर असेल विशेष नजर रोहित शर्मा, हार्दीक पंड्या, कृणाल पंड्या, केदार जाधव, कोलिन मुनरो, केन विलियम्सन, रॉस टेलर.

संभाव्य संघ यातून निवडणार
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), कोलिन मुनरो मार्टिन गुप्टिल , रॉस टेलर स्कॉट कुगगेलीजन, डॅरिल मिचेल, लोकी फेर्गसन, टीम सेइफेरत , कोलिंदी ग्रँडहोम, मिचेल सॅन्टेनेर, ईश सोधी, टीम साऊथी, ब्लेअर टिकनेर.

भारत : शिखर धवन, रोहीत शर्मा (कर्णधार), रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम एस धोनी, कृणाल पंड्या, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, शुभमन गील, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, विजय शंकर, हार्दीक पंड्या आणि सिद्धार्थ कौल.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक,
मोबाईल : ९५२७२४७९९४

LEAVE A REPLY

*