तब्बल 9 वर्षांनंतर ‘हा’ खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद

0

वेलिंगटन । अखेरच्या सामन्यात भारतकने न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर ५ सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशा फरकाने जिंकत मालिकाही खिशात घातली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज (3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियमवर पार पडला.

या सामन्यात अनेक विक्रम झाले आहेत. त्यात भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीचाही विक्रमाची भर पडली आहे. दरम्यान या सामन्यात त्याने फलंदाजीत विशेष काही करता आलेले नाही. त्याला १ धावांवर असताना ट्रेंट बोल्टने त्रिफळाचीत करत बाद केले. परंतु याच एका धावेचा विक्रम झाला आहे. त्यामुळे धोनी न्यूझीलंड विरुद्ध वनडेत जवळ जवळ 9 वर्षांनंतर एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.

याआधी तो शेवटचे न्यूझीलंड विरुद्ध १० ऑगस्ट २०१० मध्ये डम्बुल्ला येथे झालेल्या वनडे सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद झाला होता. त्यावेळी तो ०२ धावांवर बाद झाला होता.

आज धोनी बाद झाल्यानंतर भारताची अवस्था ४ बाद १८ धावा अशी झाली होती. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि विजय शंकर यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.

शेवटी आलेल्या हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करत भारताला २५० धावांचा टप्पा पार करता आला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला ४४.१ षटकात २१७ धावांवर रोखण्यात यश मिळवले. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीने प्रत्येकी २ आणि भुवनेश्वर कुमारने १ विकेट्स घेतल्या.

LEAVE A REPLY

*