दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा दणदणीत विजय

0

ऑकलंड : भारताने न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा टी-२० सामना गोलंदाजांचा भेदक मारा आणि दमदार सलामीच्या जोरावर जिंकला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने या आव्हानाचा सहज पाठलाग केला. त्याचबरोबर शिखर धवन (३०), ऋषभ पंत (४०), विजय शंकर (१४) आणि महेंद्र सिंह धोनीने (१४) धावांचे योगदान दिले.

भारताच्या कृणाल पंड्याने तीन विकेट्स मिळवत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. कृणालला यावेळी अन्य गोलंदाजांनीही चागली साथ दिली. न्यूझीलंडकडून कॉलिन डी’ ग्रँडहोमने अर्धशतकी खेळी साकारली. न्यूझीलंडच्या १५९ धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी दमदार फटकेबाजी केली.

रोहितने यावेळी २९ चेंडूंत०३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. धवनने ३० धावा करत रोहितला चांगली साथ दिली.

LEAVE A REPLY

*