पॉल कॉलिंगवूडची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

0

मुंबई : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ६८ कसोटी सामन्यात १० शतकांसह ४२५९ धाव केल्या आहेत.

तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९७ सामन्यांत ५०९२ धाव केल्या असून, गोलंदाजीत १११ बळी टिपले आहेत. तो तीन वेळा ऍशेस विजेत्या संघाचा सदस्य असून त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लडने २०१० सालचा टी – २० विश्वचषक जिंकला होता.

नुकताच इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुकने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीचा निर्णय योग्य वेळी घेतला आहे असे ४२ वर्षीय पॉल सांगतो.

LEAVE A REPLY

*