धावपटू ललिता बाबरची उपजिल्हाधिकारीपदी वर्णी

0

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणची वायुकन्या ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर-भोसले हिच्या उपजिल्हाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

रिओ ऑलिंपिकमध्ये ३०० मीटर स्टिपलचेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पहिल्या दहामध्ये येण्याचा मान ललिता बाबर-भोसलेने पटकावला होता. तिने या खेळात नवीन राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावे केला आहे. तिला या कामगिरीची दखल घेत अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

ललिता यांच्या नावाची राज्य शासनाच्या सचिवस्तरीय समितीने शासकीय सेवेत घेण्याबाबत शिफारस केली होती. या शिफारशीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यामुळे आता ललिता यांची उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती होणार आहे. अंतिम नियुक्तीचा आदेश महसूल विभागाच्या मान्यतेनंतरच निघणार आहे.

LEAVE A REPLY

*