स्वीडनला नमवून इंग्लंड उपांत्य फेरीत

0
समारा । फिफा विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि स्वीडन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगला. या सामन्यात इंग्लंडने स्वीडनला 2-0 असे पराभूत केले. सामन्यात इंग्लंडकडून झालेले दोनही गोल हे ङ्गहेडरफ स्वरूपाचे झाले. इंग्लंडच्या खेळाडूंनी योग्य वेळी चेंडूला ङ्गडोकं लावूनफ संघाला सामना जिंकवून दिला.

हाफटाईमपर्यंत इंग्लंडने स्वीडनच्या गोलपोस्टवर 5 शॉट मारले त्यातील 1 ऑन टार्गेट होता ज्याच्यावर इंग्लंडने आपला पहिला गोल नोंदवला. तर स्वीडनला इंग्लंटच्या गोलपोस्टवर एकच शॉट मारण्यात यश आले.

दुसर्‍या हाफमध्ये इंग्लंडने आपली गोलची आघाडी वाढवण्याच्या इराद्याने स्वीडनच्या गोलपोस्टवर जोरदार चढाया करण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वीडनच्या गोलपोस्टवर शॉट मारण्याचा धडाकाच लावला त्यांच्या या प्रयत्नांना 58 व्या मिनिटाला यश आले. लिंगार्डच्या साथीने अलीने गोल करत आघाडी 2 गोलने वाढवली.

सामन्यात पूर्वार्धात 30व्या मिनिटाला कॉर्नरवरून किक केलेल्या फुटबॉलला हॅरी मॅग्वायरने डोकं लावून दिशा दिली आणि इंग्लंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. कारकिर्दीतील पहिलाच आंतरराष्ट्रीय गोल वर्ल्डकपमध्ये करण्याचा मान त्याने मिळवला.

स्वीडनकडून आक्रमक सुरुवात झाली. पण त्यानंतरचा खेळ हा इंग्लंडच्या वर्चस्वाखाली गेला.

इंग्लंडने आक्रमक पवित्रा कायम ठेवत हल्ले सुरूच ठेवले. त्याचा फायदा इंग्लंडला 58व्या मिनिटाला मिळाला. सामन्यातील आणखी एका कॉर्नर किकला योग्य वेळी डोकं लावून इंग्लंडने दुसरा गोल केला.

डेले अली याने हा गोल करत इंग्लंकडून गोल करणारा 5वा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. त्यानंतर ही आघाडी कायम राखण्यात इंग्लंडला यश आले आणि त्यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

LEAVE A REPLY

*