फुटबॉल स्पर्धेत भारताचे स्वप्न भंगले

0
नवी दिल्ली । सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मादिलवने भारतावर 2-1 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले.

दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मालदीवने भारताचा 2- 1 ने पराभव करत चषकावर नाव कोरले. मालदीववर मात करत आठव्यांदा विजेतेपद पटकावण्याचे भारताचे स्वप्न अखेर भंगले आहे.

सॅफ चषकात अपराजित वाटचाल करणार्‍या भारताचा अंतिम सामन्यात मालदीवशी सामना होता. भारताने गटसाखळीत श्रीलंकेचा 2-0 आणि मालदीवचा 2-0 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत पाकिस्तानला 3-1 असे हरवून अंतिम फेरी गाठली.आतापर्यंत झालेल्या 11 स्पर्धामध्ये सात विजेतेपदांवर भारताने नाव कोरले. अंतिम सामन्यात मालदीववर मात करत सलग तिसरे विजेतेपद आणि सॅफ चषकावर आठव्यांदा नाव कोरण्यास भारतीय संघ उत्सुक होता.

मात्र, अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी निराशा केली. मालदीवच्या इब्राहिम महुधीने 19 व्या मिनिटाला तर अली फासिरने 66 व्या मिनिटाला गोल मारुन संघाला 2 0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. भारतातर्फे सुमीत पास्सीने 92 व्या मिनिटाला गोल मारला. या सामन्यात भारताचा हा एकमेव गोल ठरला.

LEAVE A REPLY

*