स्मिथचे पुनरागमनामुळे विराटचे अव्वलस्थान संपुष्टात – मिचेल स्टार्क

0
हैदराबाद ।भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑॅस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथला मागे टाकत कसोटी फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली आहे. यानंतर जगभरातून विराटवर कौतुकाचा वर्षाव झाला, मात्र ऑॅस्ट्रेलियन खेळाडू विराटच्या या कामगिरीवर खुष नसल्याचे दिसत आहेत.

ऑॅस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्क म्हणतोय की, जेव्हा स्मिथ क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, तेव्हा तो विराटला पछाडत परत एकदा कसोटी क्रमवारीतील आपले अव्वलस्थान मिळवेल.

गेली अनेक वर्षे मी स्मिथची फलंदाजी अतिशय जवळून पाहिली आहे. तो एक सर्वोत्तम फलंदाज आहे. सध्या जरी स्मिथ कसोटी क्रमवारीत दुसर्‍या स्थानी घसरला असला तरी, तो निलंबनाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर जोरदार पुनरागमन करत आपले अव्वल स्थान परच मिळवेल, असा विश्वास मिचेल स्टार्कने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जोरदार कामगिरीच्या जोरावर स्मिथला मागे टाकत विराटने 934 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. तर स्टिव्ह स्मिथ 929 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. स्मिथ मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळला होता. यानंतर क्रिकेट ऑॅस्ट्रेलियाने त्याच्यावर 1 वर्षासाठी बंदी घातली आहे.

LEAVE A REPLY

*