दादा फक्त बॉल नाही केसही स्विंग करतो! – सेहवाग

0
मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा आज 46 वा वाढदिवस आहे. यानिमित्त अनेक दिग्गजांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

हटके टवीटससाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागनेही एक मजेशीर ट्विट करत गांगुली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या टवीटमध्ये सेहवागने चार फोटो शेअर करत त्यांना विनोदी कॅप्शन्स दिलं. डावखुर्‍या सौरव गांगुली यांनी दोन पाऊलं पुढे सरसावत ठोकलेले गगनचुंबी षटकार आजही क्रिकेट चाहत्यांच्या काळजात घर करुन आहेत. सेहवागनेही असाच षटकार खेचत असणार्‍या गांगुलींचा एक फोटो शेअर केला आहे.

‘जागे व्हा, आपले डोळे दोनदा मिचकवा आणि खेळपट्टीवर डान्स करा,’ असं कॅप्शन सेहवागने या फोटोला दिलं आहे. गांगुली प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत जोरदार फटकेबाजी करत असे. अनेकदा त्यांनी ठोकलेल्या षटकारांनी प्रेक्षकही जखमी होत.

गांगुलींच्या षटकाराने जखमी झालेल्या प्रेक्षकाचा फोटोही सेहवागने आपल्या ट्विटमध्ये शेअर केला आहे. सौरव गांगुली फलंदाजीबरोबरच आपल्या गोलंदाजीनेही समोरच्या संघाला अडचणीला आणत असे. सेहवागने गोलंदाजी करणार्‍या गांगुलीचाही एक फोटो शेअर केला आहे. ‘फक्त चेंडू नाही तर केस देखील स्विंग करा,’ असं कॅप्शन सेहवागने या फोटोला दिलं आहे.

LEAVE A REPLY

*