यजमान रशियाचा क्रोएशियाकडून पराभव

0
सोची । क्रोएशियाने पेनल्टी शूटआउटमध्ये यजमान रशियाचा पराभव करून त्यांना स्पर्धेबाहेर फेकले आहे. 2-2 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआउटमध्ये क्रोएशिया ने रशियाला 4-3 अशा अंतराने पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. उपांत्यफेरीत क्रोएशियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

क्रोएशिया आणि रशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील थरार 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही कायम राहिल्याने सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाच्या सुबासिचने रशियाचा पहिलाच प्रयत्न अडवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाच्या अ‍ॅकिनफीव्हने क्रोएशियाचा प्रयत्न अपयशी ठरवला. पण पुढच्याच मिनिटाला रशियाच्या फर्नांडेजने संधी गमावली आणि सामन्याचे पारडे क्रोएशियाच्या बाजूने झुकले. इव्हान रॅकिटीचच्या विजयी गोलनंतर क्रोएशियाने 4-3 अशी बाजी मारली. 1998 नंतर तब्बल 20 वर्षानंतर क्रोएशियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

सामन्याच्या 112 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या डॅनियल सुबासिचने केलेला अविश्वसनीय बचाव रशियाचे मानसिक खच्चीकरण करणारा ठरला. मात्र, त्यानंतरही सामन्यातील नाट्य संपलेले नव्हते. 115 व्या मिनिटाला पेनल्टी बॉक्सवरून मिळालेल्या फ्री किकवर मारियो फर्नांडेजने हेडरद्वारे गोल करून सामना 2-2 अशा बरोबरीत आणला.विश्वचषक फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सुरूवातील क्रोएशिया पिछाडीवर होता.

मात्र त्यानंतर सामन्यात जोरदार मुसंडी मारत पहिल्या सत्रात यजमान रशियाला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. उपांत्यपूर्व फेरीत आक्रमक खेळ करून आघाडी घेण्याच्या रणनितीने दोन्ही संघ मैदानात उतरले होते.अनेक धक्कादायक निकाल नोंदवून बाद फेरीपर्यंत पोहोचलेल्या क्रोएशियाने रशियापेक्षा वरचढ खेळाचे प्रदर्शन केले. मात्र डेनीस चेरिशेव्हने अप्रतिम गोल करून रशियाला आघाडी मिळवून दिली.

LEAVE A REPLY

*