पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव

0

वेलिंग्टन : भारत न्यूझीलंड पहिल्या टी २० भारताला पराभव स्विकारावा लागला. भारतीय संघाला न्युझीलंड संघाने दिलेल्या २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. पाहुण्या भारताला न्यूझीलंडने १३९ धावांवर रोखले आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हा सामना न्यूझीलंडने ८० धावांनी जिंकला.

न्यूझीलंडला कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी शानदार सुरुवात करून दिली. सुरुवातीपासूनच दोघांनी आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. ४३ चेंडूंत सेइफर्टने ७ चौकार व ६ षटकार खेचून ८४ धावा केल्या. त्याला मुन्रो (३४), कर्णधार केन विलियम्सन (३४), रॉस टेलर (२३) आणि स्कॉट कुगलेंजने (२०) यांनी साथ दिली. भारताकडून हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. २० षटकांत न्यूझीलंडने ६ बाद २१९ धावांचा डोंगर उभा केला.

शिखर धवन व विजय शंकर या दोन्ही खेळाडू वगळता खेळपट्टीवर कोणीही तग धरू शकले नाही. भारताच्या फलंदाजांना इश सोधी व मिचेल सँटनर यांनी स्वस्तात बाद केले. शेवटच्या टप्प्यात खेळपट्टीवर महेंद्रसिंग धोनी होता खरा, परंतु धावा आणि चेंडू यांच्यातील वाढलेले अंतर कमी करण्यात तो अपयशी ठरला. धोनी ३९ धावांवर बाद झाला.

LEAVE A REPLY

*