Type to search

क्रीडा

आयपीएल १३ चा लिलाव कोलकात्यात होणार

Share

कोलकाता : भारतातच नाही तर, आज संपूर्ण जगभरात लोकप्रिय ठरलेली टी२० लीग म्हणजेच आयपीएल २००८-२०१९ या १२ हंगामांमध्ये प्रत्येक संघांच्या पाठीराख्यांमध्ये खूप लोकप्रियता निर्माण केली आहे.

आता २०२० मध्ये स्पर्धेचा १३ वा हंगाम खेळवण्यात येणार आहे. या हंगामाचा लिलाव हा कोलकात्यात पार पडणार आहे. मागील १२ हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सने ४ वेळा स्पर्धा जिंकली आहे. यातच मुंबईने मयंक मार्कंडेला ट्रेंड ट्रांसफर प्रक्रियेद्वारे दिल्ली कॅपिटल्सकडे बदली केले आहे. स्पर्धेचा लिलाव १९ डिसेंबरला होणार आहे. ट्रेडिंग प्रक्रिया १४ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहे.

मुख्य स्पर्धा सुरु होण्यासाठी सात महिने शिल्लक असून त्यामुळे आता आठही संघांच्या मालकांनी आपला संघ कसा भक्कम होईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. शिवाय आता प्रत्येक खेळाडूची सॅलरी कॅप ३ कोटी रुपयांनी वाढणार आहे. प्रत्येक संघ आपल्या सॅलरी पर्स मधून जास्तीत जास्त ८६ कोटी रुपये खर्च करू शकतो. राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर आणि भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आता दिल्ली कॅपिटलशी करारबद्ध जोडला जाण्याची शक्यता आहे. या सोबत किंग्ज इलेव्हन संघाचे मागील २ वर्षात आपल्या नेतृत्वात नशीब बदलू न शकलेला आर. अश्विनही दिल्ली संघात जोडला जाण्याची शक्यता आहे.

तर मागील १२ हंगामांमध्ये आतापर्यंत स्पर्धेचे विजेतेपद एकदाही जिंकू न शकलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आता पुढील वर्षीसाठी नव्या स्पोर्टस्टाफ़ सोबत जोडला जाण्याची शक्यता आहे. संघाचे मुख्य संचालक माईक हेसन असणार आहेत. तर सायमन कॅटिच संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत श्रीधर श्रीराम असतील. गतवर्षी स्पर्धेचा मेगा लिलाव जयपूरमध्ये पार पडला होता.

आठही संघांनी १०६. ८० कोटी रुपये ६० खेळाडूंवर खर्च केले होते गतवर्षी ८. ४ कोटी भावात पंजाबने वरुण चक्रवर्तीला तर राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटला आपल्या संघात सहभागी करून घेतले होते. तर ७.२ कोटी रुपयात पंजाबने सॅम करणला आपल्या संघात संधी दिली होती.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!