Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय

Share

नाशिक : विशाखापट्टणम मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या संघादरम्यान असलेलय तीन कसोटी मालिकेत भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करीत दक्षिण आफ्रिकेचा डाव १९१ धावांत गुंडाळल्याने २०३ धावांच्या मोठ्या फरकाने भारताने विजय मिळवला. या विजयासह भारताने ०३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. भारताने दिलेल्या ३९५ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ १९१ धावांवर बाद झाला.

पाचव्या दिवशी आफ्रिकेची स्थिती ०८ बाद ७० धावा असताना, डेन पीट आणि सेनुरान मुथुसामी यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाला शंभरचा टप्पा गाठण्यास सहाय्य केले. आफ्रिकासाठी पीट आणि मुथुसामीनी नवव्या विकेटसाठी भारतविरुद्ध रेकॉर्ड ७२ धावांची भागीदारी केली. पीट ५६ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला ५९ व्या ओव्हरमध्ये बोल्ड केले. दोन्ही संघातील दुसरा टेस्ट सामना १० ऑक्टोबरपासून पुणेमध्ये खेळला जाईल.

दरम्यान भारताने पहिला डाव ५०२ धावांवर घोषित केला होता. याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकी संघाला ४३१ धावा केल्या आणि भारताला ७१ धावांची आघाडी मिळवून दिली. आफ्रिकेच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला तीन विकेट घेत संघावर दबाव आणला होता. पण, डीन एल्गार याने कर्णधार फाफ डु प्लेसिस याच्या साथीने शतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. यादरम्यान, एल्गार आणि डु प्लेसिसने अर्धशतक केले. डु प्लेसिस, त्यानंतर ५५ धावा करून बाद झाला.

दुसऱ्या डावांत भारतीय संघाची सुरवात चांगली झाली नाही. मयंक अग्रवाल ०७ धावा करून केशव महाराज याच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. पण, दुसऱ्या टोकावर रोहित आक्रमक फलंदाजी करत होता. मयंक बाद होताच चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला. आणि रोहितच्या साथीने त्याने शतकी भागीदारी केली. पुजारा ८१ आणि रोहित १२७ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा ने मोठे शॉट्स खेळले आणि जलद ४० धावा करत बाद झाला. कर्णधार विराट कोहली ३१ आणि उपकर्णधार रोहित शर्मा २७ धावांवर नाबाद राहिले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!