न्यूझीलंडच्या निम्मा संघ तंबूत; भारत विजया समीप

0

वेलिंग्टन : अखेरच्या सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंड संघाला विजयासाठी २५३ धावांचे आव्हान दिले असून न्यूझीलँडच्या निम्मा संघ तंबूत परतला आहे. त्त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यासाठी विकेट्स मिळवण्यावर भर आहे.

दरम्यान भारतने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारतीय फलंदाजांना योग्य ठरवता आला नाही. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताने पहिले चार विकेट अवघ्या १८ धावांवर गमावले. ज्यानंतर संघाच्या मधल्या फळीने चांगला खेळ केला. अंबाती रायडुने सर्वाधिक ९०, केदार जाधवने ३४ तर हार्दिक पांड्याने ४५ धावांची वेगवान खेळी केली.

यानंतर भारताने १० विकेट्सच्या बदल्यात २५२ धावा जमवल्या असून सध्या धावांचा पाठलाग करत असलेल्या न्यूझीलंडची अवस्था १३२ वर ५ बाद अशी झाली आहे.

LEAVE A REPLY

*