15 सप्टेंबरला जिल्हा होणार फुटबॉलमय

0
अहमदनगर (प्रतिनिधी)– राज्य सरकारचे शालेय शिक्षण विभाग फुटबॉल खेळाच्या प्रेमात पडले आहे. यासाठी 15 सप्टेंबरला राज्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध क्रिडांगणाच्या स्थितीनुसार एकाच वेळी 10 लाख विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. फुटबॉल खेळासाठी राज्यातील जिल्हा परिषदेकडे नोंदणी करणार्‍या शाळांना सरकारकडून प्रत्येकी 3 फुटबॉल देण्यात येणार आहेत.
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वत: याबाबत बुधवारी राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्‍यांची व्हिडीओ कॅन्फरंन्स घेत त्यांना सुचना दिल्या आहेत. नगर जिल्ह्यात 1 हजार 116 प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरला फुटबॉल खेळण्यासाठी नाव नोंदणी केल्यास त्यांना सरकारकडून प्रत्येकी 3 फुटबॉल भेट देण्यात येणार आहे.
यापेक्षा अधिक फुटबॉलची आवश्यकता असल्यास शाळेने स्वखर्चाने हे फुटबॉल विकत घ्यावेत, अशा सुचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 15 सप्टेंबरला एकाच दिवशी एक लाखहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या पातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील शाळांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणार्‍या क्रीडांगणानुसार या खेळाचे नियोजन करण्याचे सरकारकडून आदेश देण्यात आलेले आहेत.

नगरच्या वाडियापार्क 15 सप्टेंबरला जिल्ह्याचा प्रतिनिधीक फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या ठिकाणी काही ग्रामीण आणि शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची फुटबॉल स्पर्धा भरवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कार्यवाही सुरू आहे.

LEAVE A REPLY

*