‘श्रीगणेश’ची वेदिका ऑलिंपियाडमध्ये देशात पहिली

0
कोपरगाव (शहर प्रतिनिधी) – नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड दिल्ली यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या इंग्लिश ऑलिम्पियाड स्पर्धेत श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलची वेदिका शेटे हिने देशात प्रथम क्रमांक मिळविला.
श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सौ. कामिनी शेटे, सचिव प्रा. विजय शेटे, मॅनेजिंग ट्रस्टी भारत शेटे, विश्‍वस्त संदीप चौधरी, प्राचार्य रामनाथ पाचोरे, ज्युनिअर कॉलेज प्राचार्य रियाज शेख यांनी या विद्यार्थीनीचे कौतुक केले.
नॅशनल ऑलिम्पियाड स्पर्धेत जिल्ह्यातून पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. नॅशनल स्पर्धेमध्ये देशातील दुसरा राउंड होता, या दुसर्‍या राउंडमध्ये वेदिकाने प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल श्रीगणेश शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. विजय शेटे यांच्या हस्ते गोल्डमेडल व प्रशस्तिपत्र देऊन तिला गौरविण्यात आले.
वेदिकाच्या उल्लेखनीय यशामुळे श्रीगणेश शिक्षण संस्थेच्या यशात मनाचा तुरा रोवला गेला. वेदिकाला प्रा. भगवान बनसोडे, प्रा. दीपक गव्हाणे, प्रा. संजय दिवटे, प्राचार्य रामनाथ पाचोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

LEAVE A REPLY

*