जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूलचा संघ प्रथम

0
प्राचार्य विश्‍वनाथ शेळके यांची माहिती
कोपरगाव(प्रतिनिधी) – जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूलच्या संघाने 17 वर्षांच्या आतील वयोगटात प्रथम क्रमांक मिळविला. आता हा संघ पुणे विभागांतर्गत विभागीय सामन्यासांठी पुणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलमध्ये खेळण्यास जाणार आहे, अशी माहिती स्कूलच्या वतीने प्राचार्य विश्‍वनाथ शेळके यांनी दिली आहे.
कोळपेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेसाठी अहमदनगर जिह्यातून एकूण 14 संघ सहभागी झाले होते. संजीवनी सैनिकी स्कूलच्या संघाने प्रथम लढतीमध्ये सेवा निकेतन, कोपरगाव संघाचा 5-0 गोलने पराभव केला. अन्य साखळी लढतीत ओम गुरूदेव इंग्लीया मीडियम संघाचा 2-0 अशा गोलने पराभव करून संजीवनीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या फेरीत संजीवनीच्या संघाने अहमदनगर येथिल आर्मी पब्लिक स्कूलबरोबर पेनॉल्टी शूटआऊट मध्ये 4-2 गोल हा सामना जिंकून थेट अंतिम फेरीत मजल मारली.
संजीवनी व अशोकनगर येथिल रामराव आदिक स्कूल मध्ये अंतिम सामना चांगलाच रंगला. यामध्ये संजीवनीच्या संघाने अशोकनगर संघाचा 1-0 अशा गोल ने पराभव करून अंतिम विजयावर शिक्कामोर्तब कले. कर्णधार आदित्य भीमराव भिसे याच्या नेतृत्वाखाली संजीवनीच्या संघाने जिल्हास्तरीय यश मिळविले. सर्व सामन्यांमध्ये गोलकिपर अमित रवींद्र म्हसे याने महत्वपूर्ण बचाव केला. यामुळे संघाला विजय मिळविणे सोपे झाले. या संघातील सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. सर्व खेळाडूंचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

खेळाडू शिवम संतोष गायकवाड, सतिश बाळासाहेब वाघ, ललित विलास दराडे, अजित रामदास महाले, सार्थक रमेश वरखडे, हर्षद सुदाम गायकवाड, मयुर गोरखनाथ कोेकाटे, चेतन बाबुराव ठोंबरे, सुदर्शन भास्कर दराडे यांनी क्रीडा शिक्षक श्री. एन.बी. शिंदे व श्री. बी. आर. औताडे यांचे मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. 

जिल्हास्तरीय यशाबद्दल सर्व खेळाडूंचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला. यवोळी सचिव ए. डी. अंत्रे, समन्वयक ज्ञानदेव सांगळे, उपप्राचार्य के. एल. दरेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*