नेवाशाच्या कन्येने पटकावले रौप्यपदक

0
नेवासा (तालुका प्रतिनिधी)- मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ओपन मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताने सर्वात जास्त पदके मिळून चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली. यात नेवाशाच्या कन्या अंजली करवंदे यांनी महत्वाची कामगिरी बजावली.
मलेशिया येथे झालेल्या या स्पर्धेसाठी नेवाशाची कन्या पूर्वाश्रमीची अंजली कमलाकर करवंदे व आता लग्नानंतर पुण्यात स्थायिक झालेल्या सौ. नीलम नितीन खानापूरकर यांनी आपली जोडीदार पुण्याचीच प्रीती दत्तात्रय म्हस्के यांच्यासह अ‍ॅथलेटिक्समध्ये अभिमानास्पद कामगिरी करून पदकांची लयलूट केली.
नीलम खानापूरकर यांना धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. तर प्रीती मस्के यांनी दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य पदकाची कमाई केली. अंजली कमलाकर करवंदे या पुण्याच्या सेंट मिराज इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शिक्षिका असून 20 वर्षापासून खेळासह हिंदी व मराठी विषय शिकवतात. त्यांच्या या यशाबद्दल नेवासा येथील त्यांच्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*