प्रीतिसुधाजी स्कूलच्या 31 विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

0
अस्तगाव (वार्ताहर) – प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलातील तब्बल 31 विद्यार्थ्यांची किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे. पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात हे विद्यार्थी खेळण्यास जाणार आहेत.
नुकत्याच राहुरी येथे झालेल्या राहुरी तालुका किकबॉक्सिंग असोसिएशन आयोजित 31 व्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत प्रीतिसुधाजी स्कूलच्या 12 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले.
7 विद्यार्थ्यांना सिल्व्हर मेडल तर 12 विद्यार्थ्यांना ब्राँझ मेडल मिळाले आहे. गोल्ड मेडल मिळविलेल्या विद्यार्थ्यांत ईशा हरगोडे, गीता रयते,जागृती बोरम्ते, जुई वैद्य, अदिती साळुंके, साहिल सबलोक, ॠत्विक अंबेसांगे, शुभम शिंदे, मडके, राजवर्धन, हर्ष धामेचा, अथर्व लडल, अथर्व पालवे, यांचा समावेश आहे.
सिल्व्हर मेडल अनन्या पाटील, दिव्या पाटील, दर्शना नहार, तोशी नहातकर, हर्षदा भडांगे, नीरज तट, तन्मय दिघोळे, याांनी पटकविले. अदिती वेलंगर, दिव्या कांतीवार, प्रणाली पवार, पौर्णिमा दिघे, यश जाधव, विवेक बामणे, रोहण चव्हाण, विराज शिंदे, सुवर्णदीप शाहू, तन्मय उरणे, सुयोग जाधव, साईराज घोरबांड, यांना या खेळात ब्राँझ मेडल मिळाले.
नुकताच या विद्यार्थ्यांचा सत्कार डांगे पॅटर्नचे प्रणेते इंद्रभानजी डांगे, तसेच पत्रकारांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सार्वमतचे वितरक रामकृष्ण लोंढे व अन्य पत्रकार उपस्थित होते. डॉ. मधुकर देशमुख, डॉ. पंडुरंग गुंजाळ, शरद निमसे, भगवानराव डांगे, शिवाजी देवढे अदि उपस्थित होते.
याविद्यार्थ्यांचे प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका सौ. पुनम डांगे, उपाध्यक्षा सौ. स्नेहलता डांगे, यांचेसह स्टाफ तसेच पालकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. प्रीतिसुधाजी स्कूलचे क्रीडाशिक्षक गणेश शार्दूल, नेहा बनकर, अरविंद पवार, श्री. भालेराव, श्री. जाधव, यांचे या विजेत्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*