Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण

Share

:महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन

मुंबई । प्रतिनिधी

हाऊसिंग सोसायटींमधील समस्यांचे निराकरण करुन अद्यावत माहिती देणे या उद्देशाने वरळी येथे 7 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत आयोजीत हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट शो 2020 ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हाऊसिंग सोसायटीज मॅनेजमेंटवरील देशातील हा पहिला एक्स्पो होता. प्रदर्शनाला चार हजारांहून अधिक हाऊसिंग आणि कमर्शिअल सोसायटी सदस्यांनी भेट दिली.

भाजप आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या शोला उपस्थित राहून स्टॉल्सना भेट दिली. या ठिकाणी ग्राहकांना अग्निसुरक्षा, स्ट्रक्चरल ऑडिट आणि सुरक्षा, डीम्ड कन्व्हेयन्स, पुनर्विकास, येणे रकमेची वसुली, सभासदांची कर्तव्ये आणि अधिकार,कचरा व्यवस्थापन, दुरुस्ती आणि जीर्णोद्धार, सामान्य भागाचा दुरुपयोग, तक्रारींची दखल आदी विषयासंबंधात तज्ज्ञांनी माहिती दिली.सदस्यांमधील वादांवर तोडगा काढणे हा या शो चा मुख्य उद्देश असल्याचे आयोजक मुकुंद राव यांनी सांगितले.

निवासी आणि कार्यालयीन जागा अधिक शांततापूर्ण आणि आनंददायी होतील, घनकचरा व्यवस्थापन, गळती, अग्नी सुरक्षा, सीसी टीव्ही सुरक्षा, अ‍ॅक्सेस कंट्रोल सिस्टम, ऑटोमेटेड बूम चालवणारे, नैसर्गिक कचर्‍यासाठी खतांची मशिन, सौर ऊर्जा आणि पर्जन्यजलसंवर्धनासाठी, पुनर्विकास, कन्व्हेयन्स, हस्तांतरण, वारसा हक्क आणि इतर कायदेशीर बाबींवर या प्रदर्शनात निशुल्क मार्गदर्शन करण्यात आले.

प्रदर्शनात महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन, पोफ्रेशनल हाऊसकीपर्स असोसिएशन, नॅशनल सॉलिड वेस्ट असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन, ऑल इंडिया रीअल इस्टेट एजंट्स असोसिएशन, आणि विमन्स लिगल फोरम फॉर हाऊसिंग सोसायटीज आदी संघटनांनी सहभाग घेतला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!