Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मेडीकल कॉलेजच्या प्रस्तावाला मिळणार गती

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशकात मेडीकल कॉलेज उभारणीचा अनेक वर्षांपासून धुळखात असलेल्या प्रस्तावाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. पदव्युत्तर आणि एमबीबीएस हे दोन्ही वैद्यकीय अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण विभागाऐवजी महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फतच चालविण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे. त्यामुळे मेडीकल कॉलेज उभारण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरण्यास मदत मिळणार आहे.

भाजप सरकार सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील नाशकात मेडीकल कॉलेज उभारु असे आश्वासन दिले होते. आता राज्यात सत्तांतर झाले असून मुख्यमंत्री ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ देखील मेडीकल कॉलेजचा प्रस्तावाबाबत सकारात्मक आहे.

याबाबत सोमवारी (दि.10) राज्य स्तरावरील रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा सोमवारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यात या प्रस्तावाबाबत चर्चा झाली.

पदवीपर्यंतचे व पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत राबविले जातात. हे अभ्यासक्रम आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातूनच ते चालविले जावेत असा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू झाल्याची माहिती समजते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!