मुस्लीम नेत्यांचे भाषण द्वेष निर्माण करणारे

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी) – हिंदुस्थानात राहाणार्‍या प्रत्येक व्यक्तीध्ये देशभक्ती हवी, वंदेमातरम् म्हणून मातृभूमीला वंदन करणे ही आपली संस्कृती आहे. मुस्लीम नागरिक अल्लाला मानतो, माता, पित्यास वंदन करतो मग आपल्या मातृभुमीस वंदन करण्यात गैर काय? भडकावू भाषण करून मुस्लीम नेते द्वेष निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिर्डीत व्यक्त केले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दुपारी साईसमाधी मंदिरात मध्यान्ह आरतीला हजेरी लावून साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, संस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, प्रताप भोसले, सचिन तांबे, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार माणिक आहेर, पोलीस उपविभागीय अधिकारी सागर पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, गजानन शेर्वेकर, रवींद्र गोंदकर आदि मान्यवर उपस्थित होते.
विधीमंडळ अधिवेशनात झालेल्या गदारोळात सपा नेते अबू आझमी तसेच एम.आय.एम.चे आमदार वारीस पठाण यांनी वंदेमातरम म्हणण्यावरून केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना ते म्हणाले, देशातला प्रत्येक मुस्लीम अल्लाला मानतो वंदन करतो, तसेच माता ,पित्यास वंदन करतो मग आपल्या मातृभूमीस वंदन करण्यात काय गैर आहेत. मुस्लीम नेते भडकावू भाषण करून तणाव निर्माण करू पाहत आहे.
उत्तर प्रदेशात मुस्लीम बहुसंख्य असताना भाजपाची सत्ता आली हे धर्मनिरपेक्षता नाही तर मग काय आहे. साईसमाधी शताब्दीनिमित्त शहरात येणार्‍या रस्त्यासाठी 52 कोटी रूपये खर्चाची कामे अंतीम टप्यात आहे. भाजप सरकारने टोलचा प्रश्न ,एल.बी.टी.,शेतकर्‍यांची कर्जमाफी, रस्ते, वीज, पाणी यावर विशेष लक्ष घालून जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. कर्जमाफीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गावागातील तरूणांनी एकत्र येऊन केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. तसेच याकामी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा.
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात सरकारने योजना आखली आहे, प्रत्येक गावात 10 जणांची समिती करून गरजू शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे. यासाठी गावाला पाच लाखांचा निधी देण्यात येईल या समितीमध्ये सरपंच व ग्रामसेवक पदसिध्द सदस्य राहतील. हा निधी नवीन खाते खोलून ग्रामपंचायतच्या नावे जमा केला जाईन.
सि.एस.आर.मधून 60 टक्के निधी सोलर प्रकल्पास देण्याचा प्रस्ताव आहे. रस्ते संवर्धनाबरोबर वृक्षसंवर्धन करणार असल्याचे ते बोलले. मंत्रीमंडळातील बैठकित गुंठेवारीला नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावर्षी राज्यात 52 हजार कि.मि.चे रस्ते बांधण्यात येणार असल्याचे सांगीतले.

 

LEAVE A REPLY

*