Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यादोन वर्षात राज्यात सहा लाख जणांना गंडविण्याचा प्रयत्न

दोन वर्षात राज्यात सहा लाख जणांना गंडविण्याचा प्रयत्न

नाशिक | नरेंद्र जोशी

सध्या जगभर वेगात ऑनलाइन व्यवहार सुरू झाल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही प्रचंड वाढल्या आहे. यामुळेच ऑनलाइन पेमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक झाले आहे.फसवणुक झाल्यानंतर गोधळुन न जाता १९३० क्रमांकावर संपर्क साधल्यास बरेच प्रश्न सुटण्यात मदत होऊ लागली आहे.

- Advertisement -

गृह मंत्रालयाने १९३० हेल्पलाइन क्रमांक सुरू केल्यानंतर महाराष्ट्ात रोज एक हजार जण या हेल्पलाईनचा लाभ घेऊन आपल्या झालेल्या फसवणुकीतुन मार्ग शोधत आहेत. गेल्या दोन वर्षात राज्यात सहा लाख जणांना गंडवीण्याचा प्रयत्न झाला.हेही यातुन स्पष्ट झाले आहे.

हल्ली रोजच्या बातम्यांमध्ये एकतरी बातमी ॅऑनलाईन फसवणुकीची हमखास असते.अनेकदा आपल्या जवळच्या लोकांचीही अशीच ऑनलाइन फसवणूक झाल्याचे दिसते. आपल्या बँक खात्यातून फसवणुकीच्या माध्यमातून भली मोठी रक्कम या प्रकारे चोरीला जाते त्यावेळी एक मोठा धक्का बसतो.

त्यावेळे नेमके काय करावे, हे कोणालीही समजत नाही. मात्र फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १९३० क्रमांक पाठ असल्यास त्याचा वापर करून ऑनलाइन फसवणूकीतुुन मार्ग निघु शकतो. २०२१ मध्ये हे मदत केंद्र स्थापन झाले आहे. महाराष्ट्रात रोज एक हजार जण या हेल्पाईनवर २४ तासात संपर्क साधत आहे. अनेकांचे व्यवहार मध्येच थांबले आहेत. काहींचे पैसे मिळाले आहे.

भारत सरकार ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्यामुळेच गृह मंत्रालयाने दूरसंचार विभागाच्या सहकार्याने नवीन हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनचे काम सायबर फसवणुकीला बळी पडणाऱ्या लोकांच्या समस्येचे त्वरित निराकरण करणे आहे.

एखाद्याची काही फसवणूक झाली तर तो व्यक्ती त्यावर कॉल करू शकतो. कॉल करताच तक्रार नोदवली जाते. तक्रार सुरू आहे याचा अर्थ सर्व तपास यंत्रणा त्यावर काम करू लागतील. सोबतच या प्रकरणात स्थानिक पोलिसांचाही सहभाग असतो. परंतु संबंधित व्यक्तीला सायबर फसवणुकीचे पुरावेदेखील सादर करावे लागतील. कारण सहसा सायबर फ्रॉडचा थेट संबंध बँकेशी असतो. यामुळेच जेव्हा जेव्हा सायबर फसवणूक होते तेव्हा पोलिस किंवा इतर एजन्सींची मदत घ्यावी लागते.

पीडित व्यक्तीकडून तक्रार येताच फसवणूक करणाऱ्याचे बँक खाते गोठवले जाते. फसवणूक करणारा व्यक्ती त्याच्या बँक खात्यातून पैसे काढू किंवा जमा करू शकत नाही. पण हे करण्यासाठी हेल्पलाइन नंबरवर तक्रार करावी लागते. अशा परिस्थितीत पैसेही परत येण्याची शक्यता असते. योग्य वेळी तक्रार नोंदविल्यास नुकसान होण्याचा धोका कमी असतो.असे आता पर्यंत आढळुन आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या