जेनिफर ब्रिकर ‘विना पायाची’ यशस्वी धावपटू

0

रोमानिया : माणूस जन्माला आल्यानंतर आपल्या पायावर उभा राहायला शिकतो. हळूहळू जीवनात बदल करीत आयुष्यात यशस्वी वाटचाल करतो. परिणामी एखादा व्यक्ती आपल्या जीवनातील संकटावर मात करून इतिहास घडवत असतो. त्यापैकीच एक म्हणजे जेनिफर ब्रीकर होय.

आयुष्यात यशस्वी माणूस आपल्या जीवनातील संकटांचा किंवा परिस्थितीचा बाऊ न करता यश संपादन करतो. त्यामुळे इतरांसमोर तो व्यक्ती एक आदर्श घालून देत असतो. जेनिफर ही जन्मापासूनच पायाने अधू असून तीने एक उत्कृष्ट धावपटू होण्याचा मान मिळविला आहे.

1987मध्ये जेनिफर यांचा जन्म झाला. तिला पाय नसल्याने तसेच घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आईवडिलांनी तिला सोडून दिले. पण जेनिफरला एका व्यक्तीने दत्तक घेऊन तिचे पालनपोषण केले. लहान असतानाच ती चेंडूंसोबत खेळत असे. त्यामुळे ती चपळ अन मेहनती होती. पॉवर टॅबलिंग नावाच्या खेळात तिने प्राविण्य मिळविले होते. त्याच वर्षी तिला यू.एस. टंबलिंग असोसिएशनच्या प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९२ च्या जुनिअर ओलम्पिकमध्ये सहभागी होत चौथ्या क्रमांकावर राहिली. त्यानंतर तिने आपले शिक्षण पूर्ण करून डिजनी वर्ल्ड मध्ये काम करण्यास सुरवात केली. पूढे ठिकठिकाणी ती व्याख्यान देण्याचे काम करू लागली. अकरा वर्षाची असताना ती जिमनास्टिक्स चॅम्पियन होती. १९९६ च्या ऑलीम्पिकला गेली असताना अमेरिकेच्या डोमिनिक मोअसनूने सुवर्णपदक जिंकल्यानंतर जेनिफर या खेळाच्या प्रेमात पडली. अन तिथून तिचा प्रवास सुरु झाला. पुढे अनेक जिम्नॅस्टिक प्रकारात सहभागी होत आपले कौशल्य पणाला लावून यशस्वी होत गेली.

जेनिफरने तेथील महिला जीमॅस्टिक्स संघात प्रवेश घेऊन सराव करण्यास सुरवात केली. हळूहळू या संघातील उत्तम खेळाडू म्हणून नावारूपास आली. पुढे जेनिफर लोकांची प्रेरणा झाली. आज मोठ्या प्रमाणावर लोक तिला फॉलो करतात. जिम्नॅस्टिक बरोबर एक्रोबेटिकही जेनिफरने संपादन केले आहे. नुकतेच त्या नृत्याचे प्रशिक्षणही घेत आहेत. जेनिफला दत्तक घेतलेल्या आईवडिलांमुळे तिला यश संपादन करता आले. दरम्यान २००८ साली जेनिफर यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्या आईसोबत राहत आहेत. जेनिफर एक्रोबेट असून उत्तम डान्सरही आहेत. जेनिफरवर ‘फाईंडिंग द फेथ अँड डेजेज टू फॉलो योर ड्रीम्स’ हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्स ने प्रकाशित केले आहे.

व्यक्तीच्या आयुष्यात जर मजबूत हेतू आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीत तो मात करू शकतो. जेनिफरच्या आयुष्यात या गोष्टी नसत्या तर आज लोकांना माहिती झाल्या नसत्या. परंतु त्यांनी अपंगत्वावर मात करीत जगाला दखल घेण्यास भाग पाडले.

  • गोकुळ पवार

LEAVE A REPLY

*