Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्हा न्यायालयाचे विशेष सरकारी वकिल मिसर पॉझिटिव्ह

जिल्हा न्यायालयाचे विशेष सरकारी वकिल मिसर पॉझिटिव्ह

नाशिक । Nashik

दुसर्‍या टप्प्यात करोनाचा संसर्ग वाढत असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या पाठोपाठ जिल्हा न्यायालयाचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपासून त्यांना थोडे लक्षण दिसून आल्याने त्यांनी तपासणी केली. त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून, सध्या त्यांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून, यामुळे जिल्हा कोर्टातील गर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जिल्हा कोर्ट याच महिन्याच्या सुरूवातीला नियमीत सुरू झाले. यानंतर अवघ्या 15 दिवसात अ‍ॅड. मिसर यांना करोनाची लागण झाली. डॉक्टराच्या त्यांना मार्गदर्शनाखाली होम क्वारनटाईन करण्यात आले असून घरातच उपचार सुरू आहेत, सध्या प्रकृती स्थिर असल्याचे अ‍ॅड मिसर यांनी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या