Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

विशेष मुलाखत : ‘खुलता कळी खुलेना’फेम विक्रांत अर्थात ओमप्रकाश शिंदेसोबत गप्पा

Share

देशदूत डिजिटल विशेष

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला समजूतदार ‘विक्रांत’ अर्थात ओमप्रकाश शिंदे. अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांना आपलंस केलं. आता तो ‘यु टर्न’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या पहिल्याच वेबसिरीजचा अनुभव त्याने आपल्यासोबत शेअर केला आहे…

‘यू टर्नचा’ अनुभव विलक्षण

मी आतापर्यंत मालिका, नाटकं आणि चित्रपट केले. मात्र मी पहिल्यांदाच वेबसिरीज मध्ये काम करतोय. पहिलीच ‘यू टर्न’ सारखी वेबसिरीज आणि ती सुद्धा, राजश्री मराठी सोबत. अगदी सोने पे सुहागाचं जणू. वेबसिरीजचा अनुभव खूप वेगळा आणि मस्त आहे. वेबसिरीजच्या चित्रीकरणाला खूप मजा आली. वेबसिरीजच्या चित्रीकरणाला खूप दगदग नसते. आपल्या भूमिकेसाठी तयारी करायला वेळ मिळत असतो. त्यामुळे भूमिकावर काम करण्यासाठी वाव मिळतो.

‘यू टर्न’ म्हणजे आपल्या सर्वांची गोष्ट

‘यू टर्न’ ही गोष्ट आहे एका सामान्य जोडप्याची. यात मी आदित्य नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या दोघांमध्ये घडणाऱ्या गोष्टींवर आधारित ही वेबसिरीज आहे. ही गोष्ट जगातील सर्व जोडप्यांमध्ये घडणारी आहे. मात्र ती खूप सुंदर पद्धतीने दाखवली आहे. माझी भूमिका पाहिली तर ती मध्येच समंजस तर मध्येच असमंजस अशी आहे. आदित्य आणि मुक्ताचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. असे असूनही काही गोष्टी दोघांनाही खटकतात. जोडप्यांच्या याच गोड आंबट नात्यावर आधारित ही वेबसिरीज आहे.

सायली अप्रतिम सहकलाकार

मी आणि सायली ‘यू टर्न’ या वेबसिरीजच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. आम्ही दोघांनी यापूर्वी कधीही सोबत काम केले नव्हते मात्र, आम्ही एकमेकांना ओळखत होतो. त्यामुळे काम करताना आम्ही एकमेकांबरोबर कम्फर्टेबल होतो. सीन करताना कलाकारांकडून योग्य प्रतिसाद मिळणे आवश्यक असते. आमची आधी पासून ओळख असल्यामुळे आमच्या एक चांगला बॉण्ड तयार झाला होता.

सर्वच माध्यमं प्रभावी

नाटकं, मालिका, चित्रपट आणि वेबसिरीज ही सर्वच माध्यमं एकमेकांपासून खूप वेगळी आणि प्रभावी माध्यमं आहे. प्रत्येक माध्यम तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकवत असते. वेगवेगळे अनुभव येतात. त्यामुळे या सर्व माध्यमात काम करणे महत्वाचे आहे. नाटकं तर कलाकारांसाठी विद्यापीठच आहे. मालिकांसाठी खूप वेळ द्यावा लागतो तर चित्रपट मर्यादित वेळेत पूर्ण होतात. प्रत्येक माध्यमाचे स्वतःचे असे वैशिट्य आहे. म्हणूनच मला प्रत्येक माध्यमात काम करायला आवडते.

सध्या ‘यू टर्न’

आता सध्या काही चित्रपटांसाठी बोलणी चालू आहे. शिवाय काही ऑफर सुद्धा आल्या आहेत. लवकरच प्रेक्षक मला नवीन प्रोजेक्ट मध्ये बघतील. शिवाय आता ‘यू टर्न’ वेबसिरीज देखील प्रदर्शित झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!