Wednesday, April 24, 2024
Homeनगरसात ठिकाणी सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी

सात ठिकाणी सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी

राहाता, नगर, संगमनेर आणि कर्जतचे सभापतिपद सर्वसाधारण महिला तर राहुरी, श्रीरामपूर ओबीसी महिलांना मिळणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. यात आरक्षण सोडतीमध्ये सात पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी निघाले असून यातील राहाता, नगर, संगमनेर आणि कर्जत हे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तर पारनेर, नेवासा आणि शेवगाव हे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाले आहे.

- Advertisement -

पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांकरिता आरक्षण निश्चित करावयाचे होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी महसूल उर्मिला पाटील यांनी यासंदर्भातील कार्यवाही विविध राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थितीत सर्वांसमक्ष केली. अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, तहसीलदार (सामान्य प्रशासन) वैशाली आव्हाड आदींची यावेळी उपस्थिती होती.

14 पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार विविध प्रवर्गासाठीचे आरक्षण- अनुसूचित जाती- श्रीगोंदा, अनुसूचित जाती महिला- कोपरगाव, अनुसूचित जमाती- जामखेड, नागरीकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह)- अकोले, पाथर्डी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह)- राहुरी, श्रीरामपूर, सर्वसाधारण- पारनेर, नेवासा, शेवगाव, आणि सर्वसाधारण महिला- संगमनेर, राहाता, नगर, कर्जत यांचा यात समावेश आहे.

जामखेड पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी निघाले आहे. मात्र, या ठिकाणी पंचायत समितीचे चार सदस्य असून यापैकी एकही सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेला नाही. यामुळे याबाबत सरकारचे मार्गदर्शन घेवून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

राहुरीत पुन्हा महिलाराज
श्रीरामपुरात वंदना मुरकुटेंचा मार्ग मोकळा
नेवाशात गडाखच ठरविणार नवा सभापती
राहत्यात ‘प्रवरा’ला यंदा मिळणार संधी
कोपरगावात काळे गटाच्या जगधनेंची लॉटरी
अकोलेत भाजप-सेनेत लढतीची शक्यता

- Advertisment -

ताज्या बातम्या