पोलिसांनी कुटुंबासह लूटला सहलीचा आनंद; अधीक्षक संजय दराडे यांची अनोखी संकल्पना

0
नाशिक । पोलीस म्हटले की सतत कार्यमग्न, चोवीस तास काम, त्यातच पोलीसांचा वाढलेला कामाचा ताण, सततचा बंदोबस्त, मोर्चे आंदोलने, विविध गुन्हे, तपास यात गुरफटलेल्या पोलीसांना उसंत व विश्रांती मिळत नाही. अशात कुटुंबियांबरोबर वेळ घालविण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते.

पोलीसांचा ताण-तणाव दुर व्हावा यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतुन पोलीस कुटूंबियांसाठी दर रविवारी कौटुंबिक सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. आज नाशिक विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी सप्तश्रृंगी गडावर सहकुटुंब या सहलीचा आनंद लूटला.

पोलीस अधि कारी व कर्मचार्‍यांवरील ताण तणाव कमी व्हावा, त्यांना कुटुंबियांसमवेत काही वेळ मिळावा व यातून कार्यक्षमता वाढावी यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा धडाका पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी लावला आहे.

यामध्ये सहकुटुंब चित्रपट, नाटके, कार्यशाळा, विवधि सन साजरे करणे असे उपक्रम राबविले आहेत. यामधून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनीही हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी ग्रामीण पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागातर्फे 2 मिनी बसेस एपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सहलींमध्ये जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, प्राचीन मर्मस्थळे, प्रसिध्द उद्याने इ. ठिकाणांना भेट देण्यात येणार आहे.

आज नाशिक ग्रामीण उपविभागातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे कुटूंबियांसाठी सप्तश्रृंगी गडावर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांचेसह पिंपळगाव बसवंत, ओझर, वाडीवर्‍हे, इगतपुरी, घोटी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एकुण 35 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍याच्या कुटूंबियांंना सप्तश्रृंगी गडावर नेहण्यात आले होते.

पोलीस कुटूंबियांनी अत्यंत उत्सहाने, खेळी-मेळीच्या वातारवणात या सहलीचा आनंद लूटला अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतुन सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पोलीस कुटूंबियांनी जोरदार स्वागत करून मनापासुन दाद दिली. सदर उपक्रमामुळे पोलीसांना त्यांच्या परिवाराला वेळ देता येत असून समवेत आनंद लूटण्यास मिळाला. या द्वारे नक्कीच तणाव मुक्ती साधली जाणार असल्याच्या भावना पोलीस कुटुंबियांनी व्यक्त केल्या.

 

LEAVE A REPLY

*