Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री; शिवमहाआघाडीत दोन उपमुख्यमंत्री?

Share

मुंबई | प्रतिनिधी 

कॉंग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी साथ दिल्यानंतर अखेरच्या तासाभरात राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून आला. शिवसेनेच्या गोटात मुख्यमंत्री कोण होणार यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सांभाळतील यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या १८ दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याची अखेर आज सांगता झाली. पुढचे सरकार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाशिवआघाडीचं येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अनिल परब या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. दाव्यासोबतच त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रदेखील सादर केल्याचे समजते.

त्यामुळे आता राज्यात पूर्ण ५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसण्यावर शिक्कामोर्तब झाले असून साडेसात वाजेपर्यंत राज्यपालांनी शिवसेनेला मुदत दिली होती. त्याआधीच शिवसेनेकडून दावा सादर करण्यात आला आहे.

दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता

सुरुवातीला कॉंग्रेसला विधानसभा अध्यक्षपद, राष्ट्रवादीला गृहमंत्रीपदाची चर्चा होती. मात्र आज सायंकाळी आलेल्या माहितीनुसार, शिवमहाआघाडीत दोन उपमुख्यमंत्री राहणार असल्याचे माहिती आहे. यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रावादीला उपमुख्यमंत्रीपदासह इतर महत्वाची मंत्रिपदे तिन्ही पक्षांना मिळणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!