साई चरित्रावर लवकरच दूरचित्रवाणी मालिका

0
शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या प्रचार प्रसारासाठी श्रींच्या जीवनचरित्रावर आधारीत दूरचित्रवाणी मालिका तयार करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला असून इच्छुक निर्मात्यांनी साईबाबा संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी केले आहे.
संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, डॉ. मोहन जयकर, नगराध्यक्षा सौ. योगिताताई शेळके व कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते. डॉ. हावरे म्हणाले, साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव 1 ऑक्टोबर 2017 ते 18 ऑक्टोबर 2018 या काळात साजरे करण्यात येणार आहे.
या समाधी शताब्दी महोत्सवाच्या प्रचार, प्रसार देशाच्या व जगाच्या कानाकोपर्‍यांत होण्यासाठी व भाविकांना श्रींचे जीवनचरित्र समजण्याकरिता साईसच्चरित्रावर आधारित विविध भाषांत टीव्ही मालिका तयार केल्या आहेत, अशा इच्छुक निर्मात्यांनी संस्थानच्या सीसीटीव्ही विभागाशी संपर्क साधावा असे आवहन डॉ. हावरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*