Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

सोनिया गांधी, शरद पवार यांची रविवारची भेट रद्द

Share

मुंबई- काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत होणारी भेट रद्द झाली आहे. 17 नोव्हेंबर म्हणजे रविवारी ही भेट होणार होती. पण आता ही भेट सोमवारी होणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्र सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर आघाडी करण्याच्या मुद्दावर चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते भेटणार होते. राज्यात नव्याने आकाराला येणार्‍या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाशिवआघाडीने किमान समान कार्यक्रमही निश्चित केला आहे. सोनिया गांधी, शरद पवार भेटी किमान समान कार्यक्रम आणि तिन्ही पक्षांमध्ये होणार्‍या खातेवाटपावर चर्चा होणार असल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सूत्रांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एका बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा अहवाल तयार केला. हा अहवाल आता पक्षाच्या प्रमुखांना देण्यात आला आहे. प्रमुख नेत्यांनी यावर अंतिम निर्णय घेतल्यावरच पुढील निर्णय समोर येणार आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुखांची भेट महत्त्वाची मानली जात होती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही सुरुवात होत आहे. त्यामुळे दिल्लीत राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर काय घडामोडी घडतात त्याकडे लक्ष लागले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!