Type to search

नंदुरबार फिचर्स मुख्य बातम्या

सोनगढनजिक भीषण तिहेरी अपघात, 9 ठार, 23 जखमी

Share

नंदुरबार

महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर सोनगढजवळील पोखरण गावात आज सायंकाळी झालेल्या तिहेरी भिषण अपघातात 9 जण ठार तर 24 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत बस, टँकर व क्रुझरचा समावेश होता. मयतात मालेगाव व नवापूर येथील प्रवाशांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सायंकाळी महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर असलेल्या सोनगढ गावाजवळील पोखरण गावातील आश्रम शाळेजवळ कुशलगडहून उकईकडे जाणारी सोनगड आगारातील एसटी-बस (क्रमांक जी.जे.-18-झेड-6468)ला समोरुन येणार्‍या टँकर (क्रमांक जी.जे.-20-एक्स एक्स -6588) यांच्यात धडक झाली. त्याच दरम्यान भरधाव वेगातील क्रुझर (एम.एच.41-ए.एच.-5309) हेदेखील अपघातग्रस्त दोघा वाहनांना येऊन धडकल्याने तिहेरी अपघात घडला. या अपघातात 9 जण जागीच ठार झाले तर 23 जण गंभीर जखमी झाले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर सुरत महामार्गावरील गुजरात राज्याच्या हद्दीत सोनगडनजीक टँकर व्राँग साईडने आल्याने कुशलगढ-सुरत-उकई बसला धडक दिली. या दरम्यान मागून भरधाव वेगाने येणार्‍या प्रवाशी क्रुझरने बसला मागावून जोरदार धडक दिली. यात गुजरात परिवहन विभागाची एका बाजूने बस अर्ध्यापर्यंत कापली गेली. घटनास्थळी सात प्रवाशांचा मृत्यू झाला तर उपचारादरम्यान 2 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा 9 वर गेला असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या अपघातामुळे नागपूर सुरत महामार्ग घटनास्थळ रक्तरंजित झाल्याचे दिसून आले. अपघात होतात आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन प्रवाशांना बसमधून बाहेर काढून 108 अ‍ॅम्बुलन्स बोलून व्यारा सोनगड सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. गुजरात राज्यातील व्यारा व सोनगड सरकारी रुग्णालयात मृतक प्रवासी व जखमी प्रवासी यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

महाराष्ट्र राज्यातील मृतक

समाधान अशोक शिंदे (वय 50)
अशोक निकम (मालेगाव)
विश्वास रतन निकम (वय 42, सर्व रा.मालेगाव)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!