मला माझं नाव बदलायचं की नाही हे मी ठरवणार- सोनम कपुर

0
मुंबई :लग्न झाल्यानंतर मुली आपलं आडनाव बदलतात. लग्नानंतर माहेरचं आणि सासरचं अशी दोन्ही आडनावं लावणं, फार कॉमन झालं आहे. मात्र काही दुटप्पी सोशल मीडिया यूझर्सनी अभिनेत्री सोनम कपूरवर टीकेची झोड उठवली आहे. लग्नानंतर पतीचं आडनाव लावल्यामुळे सोनमला ट्रोल केलं जात आहे. आनंद अहुजासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोनमने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊण्टवरचं नाव बदललं. ‘सोनम कपूर’ हे नाव बदलून तिने ‘सोनम के अहुजा’ असं ठेवलं.
टिकेकरांना उत्तर देत सोनम म्हणाली कि, मला माझं नाव बदलायचं की नाही हे मी ठरवणार. आनंदनेही आपलं नाव बदलं पण त्यावर कुणी काही बोललं नाही. तुम्ही आनंदलाही विचारलं पाहिजे त्याने नाव का बदलं ? असा उपरोधी टोलाही सोनमने लगावला.

LEAVE A REPLY

*