अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बनणार परीक्षक

0

मुंबई : झी युवा लवकरच ‘अप्सरा आली’ हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. अप्सरा आली हे ठसकेदार गाणं आणि या गाण्यातून जिने अख्ख्या महाराष्ट्राला घायाळ केलं ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी खुद्द ‘अप्सरा आली’ या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका निभावणार आहे. या कार्यक्रमात स्पर्धक महाराष्ट्रातील लोकनृत्य सादर करणार आहेत.

या कार्यक्रमात अखंड महाराष्ट्रातील टॅलेंटप्रेक्षकांना पाहायला मिळेल, तसंच या कार्यक्रमात प्रेक्षक अनेक अदाकारा आणि त्यांच्या लावणीचा ठसका पाहू शकणार आहेत. नुकतंच या कार्यक्रमाचा टिझर प्रोमो रिलीज झाला असून प्रेक्षकांची कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. अप्सरा आली हा कार्यक्रम ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘अप्सरा आली’मुळे लावणी नृत्याची परंपरा प्रेक्षक पाहू शकतील. त्यामुळे मी या कार्यक्रासाठी खूप उत्सुकआहे, अशी प्रतिक्रिया सोनालीने दिली.

LEAVE A REPLY

*