TWEET : सोशल मिडीयावर ‘सोनाली’च्या हेअर कटचीच चर्चा

0

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी ‘हंपी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी स्पेशल हेअर कट केला आहे. तिच्या या हेअर कटची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा होत आहे.

नवीन लूकबद्दल सोनाली म्हणाली, ‘आजपर्यंत मी कधीच माझे केस इतके कमी केले नव्हते. त्यामुळे मला केस कापवेसेही वाटत नव्हते. माझ्या या भूमिकेसाठी शॉर्ट केस असावेत, ही प्रकाशचीच कल्पना होती. या भूमिकेत मी आधीपेक्षा वेगळं दिसावं अशी असं त्याला वाटत होतं.  माझी भूमिका, ईशा ही टॉम बॉय आहे. तिच्या आनंद शोधण्याची गोष्ट या चित्रपटात आहे. ती शोधत असलेला आनंद तिला हंपीमध्ये सापडतो का, हे चित्रपटात पहायला मिळेल. ही भूमिका साकारता खूप मजा आली.

या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी,अभिनेता प्रियदर्शन जाधव, ललित प्रभाकर दिसणार आहेत.

येत्या ३ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं लेखन आदिती मोघेनं, दिग्दर्शन प्रकाश कुंटेनं आणि सिनेमॅटोग्राफी अमलेंदू चौधरी यांची आहे.

LEAVE A REPLY

*