Gallery : सोमेश्वर धबधब्याजवळ जीव धोक्यात घालून सेल्फी

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, ता. १४ : काल रात्रीपासून संततधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. सोमेश्वरजवळील धबधबा आता अर्धा भरला आहे.

धबधब्यावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

धबधब्याचे सौदर्य अधिकच खुलले आहे, मात्र येथील परिसरात वरपर्यंत पाणी आल्याने तेथे धोकादायक परिस्थिती आहे.

सकाळपासून नाशिककरांची धबधब्यावर गर्दी होत आहे.

 काही उत्साही नाशिककर धबधब्याच्या अगदी काठावर जीव धोक्यात घालून सेल्फी घेताना दिसत आहेत.

याठिकाणी पर्यटकांच्या गाड्या, तरुणांच्या दुचाकी जमू लागल्या असून पावसाळी वातावरणात मक्याचे कणीस खाण्याचा आनंदही काही जण घेत आहेत.

LEAVE A REPLY

*