Friday, May 3, 2024
Homeराजकीय'कुछ यादे और कुछ वादे'; पंकजा मुंडेंनी ट्विट केला 'तो' व्हिडिओ

‘कुछ यादे और कुछ वादे’; पंकजा मुंडेंनी ट्विट केला ‘तो’ व्हिडिओ

मुंबई । Mumbai

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यात आणखी भर घातली आहे. त्यांनी आज एक ट्विट करून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली.

- Advertisement -

पंकजा मुंडे यांनी ट्वीटकरून यंदाची जनगणना ही जातीनिहाय करावी अशी मागणी केली आहे. ‘२०२१ ची जनगणनाही जातीनिहाय होणे गरजेचं आहे. गावा-गावातून होणारी मागणी ही दिल्लीपर्यंत पोहोचणार यात शंका नाही’, असं पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे.

तसेच पंकजा मुंडे यांनी आपले वडील आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेतील भाषणाचा एक व्हिडीओ सुद्धा ट्वीट केला आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या याच भाषणाचा दाखला देत, जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. हम भी इस देश के है हमारी भी गिनती करो.. ओबीसी जनगणना की आवश्यकता और अपरिहार्यता है ..कुछ यादे और कुछ वादे. असे कॅप्शन देत गोपीनाथ मुंडेंचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

देशाची १६ वी जनगणना २०२१ मध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही जनगणना मोबाइल अ‍ॅपवरून होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असल्याची याआधी माहिती दिली आहे. जनगणनेला एप्रिल किंवा मे महिन्यात सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या