Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

माझे करिअर संपवण्याचा प्रयत्न होतोय; मला २०२० च्या ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत करायचे आहे

Share

नाशिक । प्रतिनिधी

माझे करीअर संपवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहेत. त्यातच माझ्या पत्नीकडून माझ्याकडे वेळोवेळी आर्थिक मागणी होत होती. ती पूर्ण न केल्याने तिने माझ्यावर खोटे आरोप केल्याचा दावा ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळने केला आहे.

‘माझे रोइंगमधील करीअर संपवण्याचा प्रयत्न अनेक क्षेत्रांतून होत असून यामुळेच उलट सुलट बातम्या पसरवल्या जात असल्याचे दत्तू भोकनळ याने सांगितले.

तो म्हणाला,  माझ्याविरोधात खोटे आरोप लावून माझ्या आगामी ऑलिम्पिकसाठीच्या सरावावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न होत आहे. मी, एक जवान आहे, त्यामुळे मला जे काही सांगायचे ते न्यायालयात यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या आरोपांवर मी प्रतिक्रिया दिल्या नसल्याचेही भोकनळ याने देशदूतशी बोलताना सांगितले.

गेल्या काही आठवडयापूर्वी दत्तू भोकनळ याच्याविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात त्याची पत्नी आशा हिने कौटुंबिक छळ आणि फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्यात न्यायालयाने बुधवारी (दि. 29) दत्तू भोकनळ यास जामीन मंजूर केला. यानंतर (दि. 30) पत्रकार परिषदेत बोलतना भोकनळ म्हणाला, मी विवाह झाल्याचे कधीच नाकारले नव्हतेच.

वेळोवेळी माझ्या पत्नीकडून आर्थिक मागणी केली जात होती. परंतु ती पूर्ण न केल्याने तीने खोटे आरोप केल्याचा दावा दत्तूने केला आहे. तसेच येत्या 2020 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्यासाठी मी झटत असताना सरावावरून माझे लक्ष विचलीत व्हावे, यासाठीच माझ्यावर खोटे आरोप करून गुन्हा दाखल केला आहे.

अंतिम निकालानंतर माझ्याविरोधात षडयंत्र रचणार्‍यांची नावे सांगेल. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून माझे सर्व लक्ष सरावावर केंद्रीत केले आहे. देशासाठी सुवर्णपदक आणण्यासाठी मी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.


न्यायदेवताच मला न्याय देईल 

मी खूप कष्ट करून आज इथवर पोहोचलो आहे. काबाड कष्ट करून मी लष्करात भरती झालो. हातावर फोड येईपर्यंत मी सराव केला तेव्हा मला देशासाठी पदक जिंकता आले. पदक मिळाल्यानंतर माझा जीवनपट सर्वांनीच दाखवला होता. मी उद्धट आहे, रागीट आहे वगैरे नको ते आरोप माझ्यावर सध्या काहींकडून केले जात आहेत. मात्र साफ सर्व खोटे आहे. मला आगामी ऑलिम्पिक खेळायची असून पदक जिंकायचे आहे. न्यायदेवतेवर विश्वास असून मला योग्य न्याय मिळेल.

दत्तू भोकनळ, ऑलिम्पिकपटू नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!