पाककृती : उन्हाळ्यात अवश्य प्या सोलकढी

0

सोलकढी म्हणजे पचनास उत्तम पेय. नुसती प्यायला किंवा भातावर घ्यायला छान लागते. कोकणात जास्त प्रसिद्ध. कोकणात मासे किंवा चिकनचा बेत असेल तर हमखास सोलकढी करतात.

साहित्य –

ताज्या नारळाचं दूध २ कप  , ४-५ आमसुलं किंवा कोकम , १ हिरवी मिरची , १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर , १-२  लसूण पाकळ्या ( आवडीनुसार ), १- १/२ टीस्पून साखर , मीठ चवीप्रमाणे.

कृती –

एक कप ताज्या खोबऱ्याचे  तुकडे आणि १ कप पाणी मिक्सर किंवा ब्लेंडर मध्ये घालून त्याची प्युरी करा. सुती कपड्यातून ही प्युरी गाळून घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दूध काढा.

तोच चोथा पुन्हा थोड्या पाण्यात घालून याच पद्धतीने दूध काढा. साधारण एका नारळातून २ – १/२ कप दूध निघतं. उरलेला चोथा फेकून द्या. रेडीमेड कोकोनट मिल्क वापरणार असाल तर १ कप कोकोनट मिल्क घ्या आणि त्यात १ कप पाणी घालून पातळ करून घ्या. आमसूल पाण्यात ३०-३५ मिनिटे भिजत घाला म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल.

अर्ध्या तासाने कोकमचं पाणी नारळाच्या दुधात घालून कोकम बाजूला काढून ठेवा. नंतर साखर मीठ  घालून ढवळून घ्या. हिरवी मिरची तुकडे करून घाला.लसूण ठेचून घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण थोडावेळ थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. तुमची सोलकढी तयार.

LEAVE A REPLY

*