Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : बनावट कागदपत्रे दाखवत सैन्यात भरती; आंध्रप्रदेशमधील एकावर गुन्हा

Share

नाशिक  | प्रतिनिधी

आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने बनावट कागदपत्रे व दाखले तयार करून सोल्जर (जीडी) या पदावर नोकरी मिळवून सरकारची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संरक्षण या केंद्र सरकारच्या महत्वाच्या खात्यात अशा प्रकारचा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नाशिकमधील आर्टिलरी सेंटर येथे ट्रेनिंग रेजिमेंटमध्ये लान्सनायक पदावर कार्यरत असलेले नवनाथ गोरक्षनाथ आव्हाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून, फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, की ते रेडिओ ऑपरेटर व इन्स्ट्रक्टर म्हणून भरती झालेल्या उमेदवारांना शिकवितात.

24 सप्टेंबर 2018 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम् एक युवक भरती झाला. या भरतीमध्ये शारीरिक चाचणी व लेखी चाचणी घेऊन उत्तीर्ण झालेल्या व सदर पदासाठी लागणार्‍या त्याचे मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्रांची पूर्तता करणार्‍या उमेदवारांची निवड करण्यात आली होती.

या भरतीत उत्तीर्ण झालेले उमेदवार प्रशिक्षण घेण्यासाठी सप्टेंबर 2018 मध्ये आर्टिलरी सेंटर येथे दाखल झाले होते. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक व इतर मूळ कागदपत्रांची सत्यता व पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठविण्यात आले होते.

या उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्याचे नाव सदलापल्ली दुर्गाप्रसाद असे असून, जन्मतारीख 15 मे 1995 असे नमूद करण्यात आले आहे. त्याने भरतीच्या वेळी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून दाखल केल्याचे आढळून आले.

यावरून सैन्यदलात भरती होण्यासाठी त्याने त्याची मूळ जन्मतारीख व नाव बदलून बनावट कागदपत्रे तयार करून भारतीय सैन्यदलात सोल्जर (जीडी) या पदावर नोकरी मिळवून सरकारची फसवणूक केली.

दरम्यान, या व्यक्तीच्या विरोधात भा. दं. वि. कलम 420, 467, 468 व 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. बाकळे अधिक तपास करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!