Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकमध्ये सूर्यग्रहण फिव्हर; अंनिसचे प्रबोधन, महिलांसह असंख्य नाशिककरांनी बघितले सूर्यग्रहण

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये कालपासूनच आज दिसणाऱ्या सूर्यग्रहण पाहण्यासाठी आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अनेकांनी तयारी करून ठेवली होती. सकाळी उठल्याबरोबर असंख्य नाशिककरांनी इमारतीची गच्ची, रामकुंड परिसर, मोकळ्या मैदानात जाऊन सुर्याग्रहानाचा आनंद घेतला. यावेळी, काळे चष्मे, सौरचष्मे वापरून सूर्यग्रहण पाहण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्याप्रमाणे नाशिककरांनी सूर्यग्रहण पहिले.

दुसरीकडे ग्रहण पाहू नये, गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये तसेच ग्रहण काळात काही खाऊ किंवा पिऊ नये असेही बोलले जात होते. मात्र,  गोदातीरी  अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांनाच आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे सूर्यग्रहण पाहणाऱ्यांना सौर चष्म्यांचे वाटपही अंनिसने केले होते.

नाशिकमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसले. ठिकठिकाणी सौरचष्म्यातून बघितले गेले सूर्यग्रहण

नाशिकमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसले. ठिकठिकाणी सौरचष्म्यातून बघितले गेले सूर्यग्रहण

Posted by Deshdoot on Wednesday, 25 December 2019

दशकातील सर्वात मोठे मोठे अर्थात सुमारे साडे तीन तासांचे कंकणाकृती सूर्यग्रहण आज पार पडले. संपूर्ण देशभरातून हे सूर्यग्रहण दिसून आले.

ग्रहण दरम्यान चंद्रांच्या सावलीने पृथ्वीचा 323 कि.मी.चा व्यास व्यापेल व सुमारे 20 हजार कि.मी.चा प्रवास करणार असल्याचे तज्ञांनी सांगितले होते. कंकणाकृती सूर्यग्रहण आज नाशिकमध्ये दिसून आले.

ढगाळ वातावरण असुनही सूर्य दिसल्याने खगोलप्रेमी आनंदात दिसून आले. एका बाजुला भाविक ग्रहणाला घाबरत नदीत कर्मकांड करत असतांना दुसरीकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने प्रबोधन  करण्यांत आलेले दिसून आले.

अंनिसकडून सौर चष्म्यांचे वितरण करत भाविकांना सूर्यग्रहण दाखविण्यात आले. या वेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांच्या मनात असलेल्या अंधश्रद्धा  दूर करण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी अन्न पाणी सेवन केले. महिला कार्यकर्त्यांनी भाजी कापुन दाखविली. अशा प्रकारचे कृतीशील प्रबोधन याप्रसंगी करण्यात आले.

यावेळी  महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, राज्य पदाधिकारी प्रा.डॉ.सुदेश घोडेराव, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुशील कुमार इंदवे, जिल्हा प्रधान सचिव अॅड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे, प्रल्हाद मिस्त्री, नितीन बागूल,प्रमिला चव्हाण , विजय खंडेराव, शशिकांत खडताळे उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!